सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती त्यावरुन विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा केल्या आहेत. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

“प्रत्येक सणांच्या शुभेच्छा देताना त्यापुढे हॅप्पी हा शब्द जोडू नका. हा शब्द जोडून त्याचे महत्त्व कमी करु नका. शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. हॅप्पी लिहून तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या धर्मात फरक निर्माण करू नका. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा”, असे केतकी चितळेने म्हटले आहे.

ketki chitale

आणखी वाचा : “१० वर्षांनंतर मला तुरुंगात टाकले तेव्हा…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने तिला आरसा दाखवला आहे. त्या नेटकऱ्याने तिची २०१८ मध्ये लिहिलेली एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘हॅप्पी दिवाळी’ असे लिहिले होते. ‘आता आम्ही काय बोलणार ?’ असा प्रश्न त्या नेटकऱ्याने त्याला विचारला आहे. त्यावर केतकीने ‘हेच की माणूस शिकतो व त्याच्यात बदल घडतो’, असे प्रत्युत्तर त्याला दिले आहे. तर इतर नेटकऱ्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader