अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिने एक भन्नाट रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शॉपिंगदरम्यानचा एक किस्सा सांगताना दिसत आहे. यावेळी तिने शॉपिंग करतेवेळी तिचे पती समीर वानखेडे कशाप्रकारे वागतात? याबद्दलही तिने सांगितले आहे.

क्रांतीने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने मॉलमधील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी क्रांती म्हणते की, “मी एका मॉलमध्ये गेले होते. तिथे एक नवरा चक्क बायकोसोबत तिचे चप्पल खरेदी करण्यासाठी आला होता. ते बघितल्यावर मला आणखी एक हार्टअटॅक आला. तो मुलगा तिला म्हणतो की, बेबी तुला ही चप्पल चांगली दिसेल का? हा रंग तुला चांगला वाटेल का? ही चप्पल घाल आणि चालून दाखव, असे सांगत होता. त्याला पाहून मला असं वाटलं की कोण असतात ही माणसं?”.

“पण आमच्याकडे साधी चप्पल सोडा आम्ही एकत्र वापरणारी एखादी वस्तू म्हणजे चादर जरी शॉपिंग करायला गेलो. तर त्यातही त्याला फार रस नसतो. मी समीरला विचारते की ही डिझाईन कशी आहे, त्यावर ते नेहमी म्हणतात सगळं सेमचं तर आहे. कसला रंग? तुला काय हवं ते लवकर घे आणि लवकर आवर”, असा समीर वानखेडेंचा किस्सा क्रांती सांगताना दिसत आहे.

विशेष म्हणजे तिने हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यावर तिचे वडील म्हणतात की, “अंग वेडे तो तिचा नवरा नसेल, बॉयफ्रेंड असेल. लग्नानंतर असं काहीही नसतं”, असेही ती या व्हिडीओत म्हणाली.

दरम्यान तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे. “मला खात्री आहे की पहिल्या प्रकारातील नवरे असतात. मला झेपला नसता ही गोष्ट वेगळी. पण पपांच्या ब्रह्मज्ञानाचं काय करुया. तुमचा कोणता आहे टाइप १ की टाइप २”, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

“पुण्यात नेऊन माझी किडनी काढून घेतली तर…?” ‘झुंड’मधील बाबूने सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा

तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच तिने सांगितलेला या किस्सा ऐकल्यावर अनेक महिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षावही सुरु असल्याचे दिसत आहे.

Story img Loader