अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच क्रांतीने एक भन्नाट रिल व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांती ही सध्या रेनबो या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती लंडनमध्ये शूटींग करत होती. यावेळी तिने लंडनमधील आणि मुंबईतील ट्राफिकबद्दलचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

क्रांती ही रेनबो या चित्रपटाच्या निमित्ताने काही काळ लंडनमध्ये शूटींग करत होती. यावेळी शूटींगच्या निमित्ताने ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला गेली होती. बऱ्याच काळानंतर एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी एकत्र फिरायला जाण्याचा प्लॅन आखला. आम्ही लंडनच्या एका रस्त्यावरुन गाडी चालवताना माझी मैत्रिण सतत तिकडच्या ट्राफिकबद्दल तक्रार करत होती. त्यावर क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

“तुमचा नवरा कोणत्या…”, अभिनेत्री क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यात क्रांती म्हणाली, “आम्ही लंडनच्या त्या रस्त्यावर गाडीने जात असताना आमच्या आजूबाजूला मोजून चार ते पाच गाड्या होत्या. काहीच ट्रॅफिक नव्हतं. वीक डे होता आणि भर पीक अवरमध्ये फक्त एवढंच ट्राफिक होतं. त्यावेळी तिची सारखी कुर कुर सुरु होती. किती ट्राफिक आहे, किती वेळ लागणार असं ती सतत म्हणत होती.”

त्यावर मी तिला म्हणाले की “तुला ट्रॅफिक बघायचं असेल ना तर आमच्याकडे ये कधी तरी जुहू सर्कलला. आमच्याकडे फक्त एकावर गाडी चढवू शकत नाही म्हणून नाहीतर लोकांनी ते ही केलं असतं.” अशा शब्दात क्रांती तिला मुंबईतील ट्राफिकबद्दल सांगते. यावेळी तिने ट्राफिकचा सांगितलेला विनोदी किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे.

“मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना तिने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. “अरे ट्राफिक काय असते हे कोणी मला विचारा. माझे माझ्या देशावर आणि शहरावर खूप प्रेम आहे. त्याच्यासारखे इतर कोणतेही शहर किंवा देश नाही. नाहीतर त्यावरुन काही लोक प्रवचन सुरु करतील. सो प्लीझच”, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

तिच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. गायक आनंद शिंदे यांनी यावर कमेंट करताना म्हटले की आमचा जीव्हीएलआर पण कमी नाही. ट्राफिक ट्राफिक. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील यावर कमेंट केली आहे. कधीतरी दादरला या. इथे तर गाडी चालवण्यासाठीही जागा नाही. पार्किंग बघून सरळ चालावं लागतं, असे तिने कमेंट करताना म्हटले आहे. फक्त कलाकार नव्हे तर अनेक नेटकरीही यावर व्यक्त होताना दिसत आहेत.