‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी नाईक ही सातत्याने चर्चेत आहे. ती लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं असताना आता प्रदीपने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
प्रदीप खरेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप हा इन्स्टाग्रामवर विविध स्टोरी शेअर करताना दिसत आहे. काही तासांपूर्वी प्रदीपने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक शायरी पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : Manasi Naik Divorce: “मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय कारण…” अखेर मानसी नाईकने चर्चांवर सोडलं मौन
प्रदीप खरेराने शेअर केलेली शायरी
“रो रहाँ हू एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से,
तजुर्बा है तभी तो कहं रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहोब्बत से!!”
त्याबरोबर त्याने आणखी एक शायरीही शेअर केली आहे. त्यात त्याने अप्रत्यक्षरित्या खासगी आयुष्य आणि प्रेमाबद्दल भाष्य केले.
“बेहाल इतने रहे है हम की अपने खुद के हाल भूल गये है
ये उँची उडान् भरने वाले परिंदे लगता है गुलैल की मार भूल गये है
और एक वक्त तक खामोश क्या बैठा था मै, लगता है ये मेरे मुक्को की रफ्तार भूल गये है”, अशीही एक शायरी प्रदीपने शेअर केली आहे.
आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन
सध्या प्रदीपने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टचा संदर्भ त्याच्या खासगी आयुष्याशी जोडला जात आहे. दरम्यान त्याची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र अद्याप त्याने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.