आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईकने काही आठवड्यांपूर्वीच पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली. मानसीने घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे. तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने चर्चेत आहे. घटस्फोटांच्या या वृत्तांच्या दरम्यान आता मानसीने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत भावूक पोस्ट करताना दिसत आहे. मानसी नाईकने घटस्फोटांच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

मानसी नाईकची पोस्ट

“मी एक विजेती आहे,
मी माझ्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.
मी समोर आलेल्या अडथळ्याकडे चांगली संधी म्हणून पाहते आणि त्यावर मात करते.
मी कोण आहे यावर मला विश्वास आहे.
मी जगाला काय देऊ इच्छिते याचा मला विश्वास आहे.
मला माझ्या क्षमतेवर आणि माझ्या उद्देशावर विश्वास आहे.
मी भीती, शंका किंवा निराशा आल्यावर कधीही मागे हटत नाही.
मी या जगासाठी काहीतरी सुंदर आणि अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी फार इच्छुक आहे”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress manasi naik instagram post said i am confident viral nrp