अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख असलेल्या मनवा नाईकने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. नुकतंच मनवा नाईकबरोबर एका कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे.

मनवा नाईकने फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर वांद्र कुर्ला संकुल परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्या कॅब चालकाचा शोध घेतला असून त्याला अटक केली आहे. मोहम्मद मुराद आझम अली असे या कॅब चालकाचे नाव आहे. तो २४ वर्षांचा असून अँटॉप हिल परिसरात राहणारा रहिवाशी आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर त्याची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ५०६ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि सिग्नल जंप केल्याबद्दल मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली असून आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मनवा नाईकचा ही उबर टॅक्सीद्वारे घरी जात असताना कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले. तिला धमकीही दिली होती. या प्रकारानंतर मनवा नाईकने सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली होती. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या कॅब चालकावर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाबद्दल सांगितले होते. “मी रात्री ८.१५ च्या सुमारास उबर केली. मी वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचल्यावर तो उबर चालक हा फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नका असे सांगितले. त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असे करु नका, असं पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. यानंतर पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले.

पण त्यानंतर त्या उबर चालकाला भयंकर राग आला. त्याने तू ५०० रुपये भरणार आहेस का? असं मला चढलेल्या आवाजात विचारले. त्यावेळी मी म्हणाली, तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. थांब तुला दाखवतो, अशा शब्दात त्याने मला धमकावले. यानंतर मी त्याला गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्या असे सांगितले. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे त्याला सांगत होते. तो संपूर्ण प्रवासात माझ्याशी वाद घालत होता आणि गाडीही भरधाव वेगाने चालवत होता. वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.

काय करणार… थांब दाखवतोच आता, अशी धमकीही त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाऱ्याबरोबर फोनवर बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मी त्या चालकाला गाडी थांबव, असे सांगितले. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यावेळी त्याने कोणाला तरी फोन केला. मी जोरजोरात हाका मारु लागली. ओरडायला लागली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे”, असे मनवा नाईक म्हणाली.