मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून कविता लाड – मेढेकर यांना ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कविता लाड आणि प्रशांत दामले यांचं ‘एका लगाची पुढची गोष्ट’ हे नाटक आजही तितकंच लोकप्रिय आहे. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. नुकतंच या नाटकाबद्दल अभिनेत्री मनवा नाईकने एक पोस्ट केली आहे.

कविता लाड आणि प्रशांत दामले यांचं ‘एका लगाची पुढची गोष्ट’ या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याचे आजही अनेक चाहते आहेत. नुकतंच मनवा नाईकने हे नाटक पाहिलं. त्यानंतर तिने या नाटकाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “हे वय होतं का सोडून जायचं…”, किरण मानेंची भावुक पोस्ट, म्हणाले “नंतर कधीतरी याच हायवेवर…”

chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

मनवा नाईकची पोस्ट

एका लग्नाची पुढची गोष्ट अहाहाहाहा काय प्रसन्न आणि आनंद देणारा अनुभव, नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट !
गोष्ट साधी, सरळ, गंमतशीर…आणि आमचा मित्र लेखक/दिग्दर्शक अद्वैत दादरकरने त्या गोष्टी मधला गोडवा जपत नाटकाची वीण किती घट्ट तरीही किती सुरेख गुंफली आहे! ती परी अस्मानीची… आणि मला सांगा सुख म्हणजे…ही दोन्ही गाणी प्रेक्षागृहात जे चैतन्य आणत ती अनुभवण्याची गोष्ट आहे.

प्रशांत दामले ह्यांना रंगमंचावर पाहणं ही केवळ ट्रीट आहे…असा देखणा, विनोदी गायक नट होणे नाही….एनर्जी चा धबधबा ! आणि कविता लाड…अबब…काय ग्रेस…काय टायमिंग ..सुंदर नटी आणि अतिसुंदर काम… अतुल तोडणकरचे काम कमाल झाले आहे . हे ह्या तगड्या नटसंचात मिसळून त्यांना उत्तम साथ देतात… नाटक साधं पण रंजक आहे.

आणि विशेष आनंद म्हणजे…माझ्या दोन मैत्रिणींबरोबर हे नाटक पाहिलं त्यामुळे आनंद द्विगुणित नाही तर त्रिगुणित झाला…
अशी ही ही अविस्मरणीय संध्याकाळ…निखळ आनंद आणि केवळ आनंद ! , असे मनवा नाईकने म्हटले आहे.

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ विवाहबद्ध? पतीचे नाव ते लग्नाची तारीख; सर्व माहिती आली समोर

दरम्यान मनवा नाईकच्या पोस्टवर कविता मेढेकर यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी मधुगंधा, ज्योती आणि मनवा तुमचे खूप खूप आभार, असे म्हटले आहे. त्यावर मनवा नाईकने हार्ट इमोजी पोस्ट करत त्यांना प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader