चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांच्या अभिनयाची जितकी प्रशंसा होते तितकच त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे हिच्यासोबत असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मेघाच्या फोटोवर एका यूजरने अश्लील कमेंट केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी तिने पोलिसात धाव घेतली. पण पोलिसांनी सुरुवातीला तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे मेघाने सांगितले आहे. आता नयानगर पोलीसात तक्रार दाखल झाली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी मेघाने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका सहकलाकारासोबत फोटो काढला होता. तो फोटो तिने तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर तिने फोटोवरच्या कमेंट वाचल्या. या कमेंटमधील एक कमेंट वाचून तिला धक्काच बसला आहे. सरुप पांडा नावाच्या अनोख्या व्यक्तीने तिच्या फोटोवर अश्लील कमेंट केली होती. तिने या प्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या हा इसाम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

तक्रार दाखल करण्यास गेलेल्या मेघाने तिचा अनुभव शेअर केला आहे. पोलिसांनी तिला अर्धा तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तसेच कलाकारांना अशी वागणूक पोलीस देत असतील तर सामान्य माणासाची काय परिस्थीती असेल या शब्दात मेघाने नाराजी व्यक्ती केली आहे.