कास्टिंग काऊच हे सिनेसृष्टीतील एक गडद वास्तव आहे जे कोणीही नाकारु शकत नाही. बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत पुढे येऊन कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्य केली आहेत. सिनेसृष्टीत काम मिळावे यासाठी अनेक कलाकार अथक परिश्रम करत असतात. मात्र अनेकदा या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या प्रकाराचाही सामना करावा लागतो. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने याबाबत भाष्य केले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मीनल बाळ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या चित्रपटातही ती झळकली. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही तिने लाडी ही भूमिका साकारली होती. नुकतंच मीनलने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
“जर भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर…”, नागराज मंजुळेंनी व्यक्त केली इच्छा
मीनल बाळची फेसबुक पोस्ट
“प्रामाणिकपणे खूप मनापासून सिरियसली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड, संयम, श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है!!! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा, एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम.
मग काय कामावर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही. तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग. शू…..कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते… आपलं सिक्रेट.
रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तुन का, कौआ मोती खाएगा. ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही किंवा मला आक्षेप नाही, अशी पोस्ट मीनलने शेअर केली आहे.
“मी आता नेल फाइल्स…”, ट्विंकल खन्नाने उडवली विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली
दरम्यान मीनलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टद्वारे तिने विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. यात तिने सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी कशाप्रकारे धडपड करावी लागते, याबद्दलही सांगितले आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.