मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सिद्धार्थचा जन्म १४ जून १९९१ रोजी पुण्यात झाला. अभिनेत्याने २०२१ मध्ये अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान, आपल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मितालीने खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ-मिताली दोघेही एकमेकांबरोबरचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतात, परंतु नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्रीने सिद्धार्थचा मजेशीर फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिली आहे. सिद्धार्थचा पेर खातानाचा फोटो शेअर करून मितालीने त्यावर “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Idiotic Piece of Pear, आय लव्ह यू” असे लिहिले आहे. या फोटोमध्ये मिताली आणि सिद्धार्थ एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाचा वाढदिवस सिद्धार्थ-मिताली एकमेकांपासून दूर राहून साजरा करणार का? अशा चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.

हेही वाचा : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, कारण…

मितालीने टाकलेली स्टोरी री-शेअर करीत सिद्धार्थने त्यावर ‘माझे माकड’ असे बोलून आपल्या बायकोला धन्यवाद म्हटले आहे. मितालीशिवाय, सिद्धार्थला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि त्याच्या मित्रमंडळींनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : रितेशने जिनिलीयाला पुन्हा घातली लग्नाची मागणी; नवऱ्याला उत्तर देत देशमुख वहिनी म्हणाल्या, “आता…”

हेही वाचा : ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, कावेरीच्या जिवाला धोका? नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले नाराज

दरम्यान, सध्या सिद्धार्थ-मितालीच्या पॅरिसमधील फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांनीही फ्रान्स-स्पेन दौऱ्यावर असताना, पॅरिसमधील आयफेल टॉवर परिसरात रोमॅंटिक फोटो शूट केले होते. या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, गायत्री दातार यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटोंना पसंती दर्शवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mitali mayekar shared a post to wish husband siddharth chandekar on his birthday sva 00