मराठी अभिनेत्री आणि वेब सीरिज क्वीन मिथिला पालकर अल्पावधीच घराघरांत पोहोचली आहे. मिथिलाने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ‘ही चाल तुरुतुरु’ हे गाणं कप सॉंग (Cup Song) थीममध्ये गायले होते. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होऊन मिथिला नावारुपाला आली होती.

हेही वाचा : Ranbir Kapoor’s Animal: ठरलं! रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा प्री-टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

मिथिला पालकरने ‘ही चाल तुरुतुरु’ हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली. आता या अभिनेत्रीने दुसऱ्या एका गाण्यावर कप सॉंग बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये मिथिला पालकरला गायक एबी वीने साथ दिली आहे. सध्या आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील “तेरे हवाले कर दिया” हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. याच गाण्याला मिथिला आणि एबी वीने कप सॉंग थीममध्ये गायले आहे.

हेही वाचा : “ते देवबाप्पाकडे का गेले?” क्रांती रेडकरच्या मुलीने रडून घातला गोंधळ, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मिथिला आणि एबी वीने गायलेल्या “तेरे हवाले…” गाण्याच्या नव्या व्हर्जनचे नेटकरी भरभरून कौतुक करीत आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने या व्हिडीओवर कमेंट करत “अशा लिटील थिंग्जमुळे आमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.” असे लिहिले आहे, तर अनेकांनी मिथिलाच्या गोड आवाजाची तुलना थेट श्रेया घोषालबरोबर केली आहे. सध्या या गाण्याला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून व्हिडीओला ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून एबी वीने, “आम्ही दोघे लवकरच आणखी एक गाणं तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत अशी घोषणा केली आहे.”

हेही वाचा : “२५ हजार कोटींचा धनादेश अन्…” ‘द केरला स्टोरी’नंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

दरम्यान, मराठमोळ्या मिथिलाने वेब सीरिजमध्ये, ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. तिच्या ‘लिटील थिंग्ज’, ‘गर्ल इन द सिटी’ या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगल प्रतिसाद दिला. तसेच मिथिलाने ‘मुरांबा’, ‘कट्टी बट्टी’, ‘कारवान’ अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Story img Loader