छोट्य़ा पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस विवाहबंधनात अडकली आहे. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणालचा विवाह झाला आहे. २५ तारखेला नाशिकमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नीरजचे कुटुंब पुण्यात राहत असले तरी तो गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेतच राहतो. त्यामुळे लग्नानंतर मृणाल अमेरिकेला रवाना होणार असल्याचे समजते. छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’मध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mrunal dusanis got married