अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. मुक्ता लवकर वाय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, ट्रेलर चांगलेच चर्चेत आहे. सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता ही मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच मुक्ता बर्वेने लोकसत्ता.कॉमशी बातचित केली. यावेळी तिने चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलाखतीदरम्यान मुक्ता बर्वेला चित्रपट आणि नाटकांबद्दल विचारण्यात आले. आतापर्यंत तुझ्या कारकिर्दीतील चित्रपट आणि नाटकांमधील भूमिकांमुळे तू समाधानी आहेस का? की अजून काही करायचं बाकी राहिलंय? असा प्रश्न यावेळी तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “मी १०० टक्के समाधानी नाही. कारण आपल्याला जेवढं काम मिळतं त्यापेक्षा जास्त करायचं असतं.”

“माझा ब्रेकअप झाला होता अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

“दुसरं म्हणजे चुका दिसत असतात म्हणूनच नवीन काम मिळावं असं वाटतं असतं. कारण ती चूक मी पुढच्या कामात करु नये, एवढीच माझी अपेक्षा असते. माझ्यासाठी मी माझं जगण फार सोपे करुन घेतलं आहे. मी भारी करणार आहे की नाही माहिती नाही, पण आधीची चूक मी पुन्हा करणार नाही. एवढे प्रयत्न मी सध्या करते. त्यामुळे मला भरपूर काम करायला आवडेल कारण माझ्या चुका भरपूर असणार हे मला माहिती आहे”, असे मुक्ताने सांगितले.

“राज ठाकरे चटकन कोणाला जवळ करत नाहीत आणि केलं तर…”, भरत जाधव यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mukta barve comment on satisfaction about movies and plays role in career nrp