सध्याच्या काळामध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन झालं आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. अनेक सेलिब्रेटी दररोज विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसतात. नुकतंच मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मुक्ता बर्वे ही इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो शेअर करत असते. नुकतंच मुक्ता बर्वेने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती एका रिक्षामध्ये दिसत आहे. यावेळी तिने तोंडावर एक स्कार्फ गुंडाळला आहे. त्यासोबत तिने सनग्लासेसही परिधान केला आहे. या फोटोला मुक्ताने हटके कॅप्शन दिले आहे.
“मी मुंबईतील कोणत्या तरी रस्त्यावर आहे. जर जमलं तर मला पकडून दाखवा. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे”, असे कॅप्शन मुक्ताने दिले आहे. त्यासोबत मुक्ता बर्वेने काही हॅशटॅगही शेअर केले आहे. यात तिने #muktabarve #mumbai #rikshaw असे लिहिले आहे. मुक्ता बर्वेच्या या पोस्टखाली अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्ता बर्वेच्या या पोस्टखाली अभिनेत्री निवेदिता सराफने ‘अप्रतिम’ असे म्हटले आहे. तर काहींनी मी तर तुझ्या आवाजाने तुला ओळखेल, अशी कमेंट केली आहे.
कंगना रणौतने शेअर केला धोनी आणि कोहलीसोबतचा ‘तो’ फोटो, म्हणाली “मी यापुढे….”
दरम्यान, मुक्ता बर्वे ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे मुक्ताने मराठी चित्रपटांसोबतच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ताकडे पाहिलं जातं. ‘हृदयांतर’, ‘बंदिशाळा’, ‘आम्ही दोघी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारली आहे.