भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ सध्या चांगलेच चर्चेत आहे. १ एप्रिल २०२३ पासून हे केंद्र प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. या सांस्कृतिक केंद्रात पहिला कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ या ठिकाणी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेही उपस्थित होती. तिने याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. यावेळी त्यांनी अंबानी कुटुंबियांचे कौतुकही केले आहे.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर
मुक्ता बर्वेची पोस्ट
“कालची रात्र ही नक्कीच खास होती. ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ यांचे खूप खूप आभार. ‘The Sound Of Music’ याचा प्रयोग मुंबईत पार पडला.
डोळ्याचं पारणं फिटलं इतका सुंदर प्रयोग आणि देखणं थिएटर. भारतात आलेलं पहिलं ब्रॅाडवे म्युझिकल. असा भव्य प्रयोग होऊ शकेल इतकं अप्रतिम थिएटर आपल्या देशात-महाराष्ट्रात- मुंबई उभं राहीलंय याचा अभिमान आणि कौतुक वाटतंय”, अशी पोस्ट मुक्ता बर्वेने केली आहे.
आणखी वाचा : “माझ्यावर प्रेम करत नाहीत त्यांना…” स्नेहल शिदमने शेअर केला गौर गोपाल दास यांच्याबरोबरचा फोटो, कॅप्शन चर्चेत
मुक्ता बर्वेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ असे म्हटले आहे. तर अपूर्वा कौशिक हिने हार्ट इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच तिच्या अनेक कलाकारांनी तिची ही पोस्ट वाचून आभार व्यक्त केले आहेत.