गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांना ओळखले जाते. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याबरोबरच त्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातही काम करत आहेत. नुकतंच त्यांना महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
निवेदिता सराफ यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक मिळाल्याची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : ‘खरं खरं सांग’ नाटकात मोठा बदल, ‘हे’ कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत, कारण..
“मी स्वरा आणि ते दोघं ह्या माझ्या नाटकासाठी मला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक मिळालं हे खरं तर team work आहे. मी सगळ्या team ची खूप आभारी आहे”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.
निवेदिता सराफ यांना महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक मिळाल्यानंतर अनेक कलाकारांनी यावर कमेंट केल्या आहेत. ‘तुमचे खूप खूप अभिनंदन’, ‘अभिनंदन मॅडम’, ‘शुभेच्छा’ अशा कमेंट त्यांच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : ‘मी स्वरा आणि ते दोघे’ नाटक पाहण्यासाठी पोहोचले जॉनी लिवर, निवेदिता सराफ म्हणाल्या “जॉनी भाऊ…”
दरम्यान ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग पार पडताना दिसत आहेत.