वयाने कितीही मोठे झालो तरीदेखील बालपणीच्या आठवणीत रमायला आजही अनेकांना आवडतं. यात सेलिब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांचे लहानपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या चर्चा रंगली आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीची.
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. कलाविश्वाप्रमाणेच पूजा सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत असल्याचं दिसून येत आहे. यात तिने बालपणीचा आणि सध्याच्या घडीचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबतच वेळ किती पटकन निघून जातो, अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, पूजा सावंत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्त’र, ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात झळकली आहे. तर, अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती.