मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्राजक्ता आता नाशिककर होणार आहे. एका कार्यक्रमात तिने याची कबुली दिली आहे.

नाशिकमध्ये नव्याने होणाऱ्या एका गृह संकुलनाच्या कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. तेव्हा प्राजक्ता माळी असं म्हणाली की, “मुंबई पुण्यात आता जागा नाहीत. पुण्यात प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचा नाशिककडे ओढा दिसून येतो. इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, सुंदर आणि छान आहे. त्यामुळे मला नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल.” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

State Minister V Somanna assurance regarding the start of Vande Bharat Railway from Kolhapur to Mumbai
कोल्हापूर- मुंबई वंदे भारतसाठी प्रयत्नशील; रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचे आश्वासन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
buldhana shegaon gajanan maharaj today114th death anniversary
संतनगरी शेगावात गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रम
Famous Ganpati Mandal in Pune
Ganesh Chaturthi 2024 : ‘हे’ आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती! जाणून घ्या त्यांचा इतिहास अन् महत्त्व, कसे घ्याल दर्शन?
Blind youth at the Dahi Handi festival in the lane of Ideal in Dadar Mumbai news
दृष्टीहीन तरुण-तरुणींचे मानवी मनोरे ठरले लक्षवेधी; नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची शानदार सलामी
Dahi Handi festival is celebrated in the Maharashtra including Mumbai news |
मुंबई, ठाण्यात ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

पिवळी साडी, मोकळे केस काश्मीरमध्ये खुललं मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य, ओळखलंत का?

प्राजक्ता मूळची पुण्याची असून आता करियरसाठी ती मुंबईत स्थायिक झाली आहे. अभिनयाच्याबरोबरीने प्राजक्ता एक उत्तम नृत्यांगणा व लेखिकाही आहे. प्राजक्ताचं ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. प्राजक्ताचे आज सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळविलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ याशोचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताला नृत्याची आवड असून ती एक उत्तम नृत्यांगणा आहे. प्राजक्ताने अनेक मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लकडाऊन लग्न’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.