मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली प्राजक्ता माळी आणि नम्रता संभेराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने तिने काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट

“वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे… परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला… आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार… जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे cherry on the cake…”, असे प्राजक्ता माळीने कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड…”, वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.