अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. प्राजक्ताला सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून निवांत वेळ मिळाला आहे. या मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता हिमालय प्रदेशमध्ये ट्रिप एण्जॉय करत आहे. या ट्रिपदरम्यान प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचीच सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.
आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकच नसल्यामुळे घेतला निर्णय
प्राजक्ता माळीने शेअर केली पोस्ट
गेले काही दिवस प्राजक्ता हिमाचल प्रदेशमधील तिचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसत आहे. ही तिची पहिली सोलो ट्रिप आहे. पण या ट्रिपदरम्यान तिला महाराष्ट्राची प्रचंड आठवण येत आहे. प्राजक्ताने तिचे हिमाचल प्रदेशमधील फोटो शेअर करत म्हटलं की, “पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा…कसं होणार माझं?”
प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन ४ ते ५ दिवस झाले आहेत. पण तिला आता महाराष्ट्राची आठवण सतावत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स देखील केल्या आहेत. तसेच हिमाचल प्रदेशमधील तिच्या फोटोंचं कौतुक देखील नेटकऱ्यांनी केलं आहे. प्राजक्ताला तिच्या बिझी शेड्युमधून काही दिवस तरी आराम मिळाला आहे.
आणखी वाचा – दिलदार कमल हासन; महागडी कार, घड्याळ अन् १३ बाईक दिल्या गिफ्ट, वाचा नेमकं काय घडलं?
प्राजक्ता सध्या वेबसीरिज, सुत्रसंचालन, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक नेहमीच होताना दिसतं. ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेला तर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता ती पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये कधी दिसणार? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.