प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून ‘अनन्या’च्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. लवकरच हा प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या अनन्या चित्रपटाची टीम ही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हृता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ चित्रपटाचा खास शो चे आयोजन करण्यात आले. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध मराठी कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने हृता दुर्गुळेसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हृतासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फडही पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने या चित्रपटाचे खास शब्दात कौतुक केले आहे.

zee marathi new serial sara kahi tichyasathi fame actor neeraj goswami
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! म्हणाला, “ऑडिशन दिल्यावर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”

“प्रतीक माझे निर्णय…”, नाटकासह छोट्या पडद्यावरील एक्झिटवर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीची पोस्ट

“काल ‘अनन्या’ चित्रपट पाहिला. “शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे.” हा विचार हा सिनेमा दृढ करतो. माझा दिग्दर्शक मित्र आणि सिनेमाचा लेखक दिग्दर्शक प्रताप फड सर, तुमचं करावं तेवढं कौतूक कमी. हा तुमचा पहिला चित्रपट आहे हे कुठेही जाणवत नाही. खूप प्रेम, खूप अभिमान, विशेष कौतुक ह्रताचं. काम खूपच आवडलं. किंबहूना सगळ्यांनीच सुंदर कामं केलीयेत.

सुव्रत जोशी, अमेय वाघ, रुचा आपटे, माझे मित्र- मैत्रीण सहाय्यक दिग्दर्शक श्रद्धा काकडे आणि अमोल भोर ह्यांचही जाम कौतूक. हा अतिशय मनोरंजक आणि आशादायी चित्रपट चूकवू नका मंडळी. येत्या २२ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. (मी चित्रपटात नाही. इतकी हसतेय की गैरसमज होऊ शकतो. म्हणून ही तळ टीप. )”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

“मी अक्षरशः रडायचे, कळवळायचे…” हृताने सांगितला ‘अनन्या’च्या शूटिंगचा अनुभव

दरम्यान एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.

Story img Loader