मराठी चित्रपट, मालिकांमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे नावारुपाला आली. प्रार्थनाने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. सोशल मीडियावर फारच सक्रिय असणारी ही अभिनेत्री सध्या लंडनमध्ये पतीसोबत सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. लंडनमधील मजा-मस्ती करतानाचे तिचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लंडनमध्ये रिल व्हिडीओ बनवण्याचा मोह तिला काही आवरला नाही. पण हा व्हिडीओ करत असताना नेमकं काय घडलं हे प्रार्थनाने सांगितलं आहे.

प्रार्थनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्वतःच व्हिडीओ शूट करताना दिसते. हा तिचा खटाटोप रिल व्हिडीओ तयार करण्यासाठी चालला आहे. पण हे करत असताना चक्क तिच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ शूट करत असताना तिच्या डोक्यावर मोबाईल पडतो. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत होते आणि थंड पाण्याच्या बाटलीने ती कपाळ शेकवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – अभिमानास्पद! कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांना मानाचं स्थान, मराठी चित्रपटांनीही मारली बाजी

“माझ्या कपाळावर टेंगुळ” असं प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. प्रार्थनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील तिच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. प्रार्थना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तिचा हा व्हिडीओ देखील हजारो लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा – Photos : मराठीमध्ये नवा प्रयोग, बोल्ड वेबसीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

प्रार्थना सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. प्रार्थनाचा या मालिकेमधील लूक आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खरं तर आपल्यातलीच वाटते. म्हणूनच तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

Story img Loader