मराठी चित्रपटसृष्टीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सध्या प्रिया चित्रपटांपासून लांब असली तरी ती चर्चेत कायम असते. सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील ती शेअर करताना दिसते. प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे. आता देखील तिने एक वर्कआऊट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या बिझी शेड्युलमध्येही प्रिया वर्कआऊट करणं कधीच सोडत नाही. तिचा फिटनेस हा तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसून येतोच. आता देखील प्रियाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रिया या व्हिडीओमध्ये विविध प्रकारचे व्यायामप्रकार करताना दिसत आहे. जिममध्ये परुळेकर यांच्याकडून ती फिटनेससाठी प्रशिक्षण घेते.

आणखी वाचा – ज्ञानवापीमधील लीक व्हिडीओसंदर्भात अक्षय कुमारने स्पष्टपणे मांडलं मत; “ते शिवलिंग आहे असं…”

व्यायामामध्ये सातत्य हवं असं प्रियाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. प्रियाने हा व्हिडीओ शेअर करताच काही तासांमध्येच नेटकऱ्यांनी याला पसंती दर्शवली. इतकंच नव्हे तर तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस असे अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये प्रिया फारच सुंदर आणि फिट दिसत आहे.

आणखी वाचा – Timepass 3 : “आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण मार्बल फोडेल”, ‘टाईमपास ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

याआधीही प्रियाने वर्कआऊटदरम्यानचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियाने सध्या तिच्या कामामधून बहुदा ब्रेक घेतला आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’, ‘आणि काय हवं’ यांसारख्या वेबसीरिजमध्ये प्रिया शेवटची दिसली. आता पुन्हा एकदा प्रियाला रुपेरी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.