Priya Berde on BJP Entry : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम का केला याचं कारण आता सांगितलं आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी पहिल्यांदाच भाजपात प्रवेश का केला? याचं कारण सांगितलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे प्रिया बेर्डेंनी?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. अनेक मर्यादा माझ्यावर तेव्हा होत्या. भाजपात मला काम करण्याचा स्पेस मिळाला. मी त्याच कारणाने भाजपात आले. आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला फक्त प्रचारापुरतंच गृहित धरलं जायचं. मात्र आता असं होणार नाही प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल असं प्रिया बेर्डे म्हणाल्या आणि आपली भाजपात प्रवेश करण्यामागची भूमिका सांगितली.

प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. आता त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचं कारणही सांगितलं.

लोक कलावंतांबाबत काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?

मागच्याच आठवड्यात गौतमी पाटीलला प्रिया बेर्डेंनी खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज मराठी सिनेसृष्टीतले काही किस्से सांगत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तमाशा कलावंतांची स्थिती पाहून मला फारच वाईट वाटतं असं त्या म्हणाल्या. या लोक कलावंतांना करोनाच्या काळात अनेकांच्या घरी कामं करावी लागली. मी माझ्या वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. मराठी सिनेसृष्टीत नेहमीच कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव होतो असंही प्रिया बेर्डे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priya berde on bjp party joining and tamasha artist statement in pune scj