‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सध्या विनोदाची हास्यपंचमी साजरी केली जात आहे. यामुळे आठवड्याच्या पाचही दिवस प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांना एक अनोखं सरप्राईज मिळणार आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या मंचावर साक्षात सुंदरी म्हणेजच ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे येणार आहेत. ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. प्रिया बेर्डे या सध्या ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकाची निर्मिती करत आहेत. सध्या रंगमंचावर हे नाटक गाजत असल्याचे दिसत आहे.
अभिनेते किरण मानेंनी शेअर केला नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो, म्हणाले…
या नाटकाची संपूर्ण टीम हास्यजत्रेत हास्याचा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांच्यासोबत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आणि मुलगा अभिनय बेर्डे सुद्धा हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आजपासून सलग ५ दिवस प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना बेर्डे कुटुंबियांच्या रूपात गोड भेट मिळणार आहे.
बेर्डे कुटुंब आणि या नाटकाची संपूर्ण टीम महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात कसा धुमाकूळ घालते, त्यासोबत कार्यक्रमातील विनोदवीर कोणते नवीन स्कीट त्यांच्यासमोर सादर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
CID मधील दयासोबत विशाखा सुभेदार शेअर करणार स्क्रीन, फोटो पोस्ट करत म्हणाली…
प्रिया बेर्डे यांनी अशी ही बनवाबनवी या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी रंगत संगत, अशी ही बनवा बनवी, एक गाडी बाकी अनाडी, अफालतून, बजरंगाची कमाल, जत्रा यासारख्या चित्रपटात काम केले. सध्या त्या पुण्यात लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवतात. त्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. प्रिया बेर्डे या विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.