छोट्या पडद्यावरील ‘बस बाई बस’ या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. खास स्त्री वर्गासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी बजावलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होतात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. कार्यक्रमातील इतर महिला आणि सुबोध भावे मिळून सहभागी झालेल्या महिलेला प्रश्न विचारून बोलतं करतात. अभिनेत्री रिंकु राजगुरूने या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात हजेरी लावली.
‘बस बाई बस’ शोमध्ये रिंकूने सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटातून रिंकूला प्रसिद्धी मिळाली. तिचे अनेक चाहते आहेत. यातील एक चाहता चक्क रिंकूच्या घरी पोहचला होता. या शोमध्ये तिला सुबोध भावेने याबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रिंकूने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला.
हेही वाचा >> Bus Bai Bus : “सैराट २ कधी येणार?”, पाहा आर्ची काय म्हणाली…
हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का? रिंकू नाही तर…
रिंकू म्हणाली, “आपण अनेक कार्यक्रमांना जातो. चाहत्यांबरोबर हात मिळवतो. अशाच एका कार्यक्रमाला गेले असता मी एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला. माझ्या लक्षातही नव्हतं तो कोण होता. एके दिवशी अचानक तो घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या”.
हेही वाचा >> Video : अमृता खानविलकरसह ‘डोला रो डोला’ गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, करण जोहर म्हणाला…
पुढे रिंकू म्हणाली, “एवढंच नाही तर त्यानंतर तो अनेकदा माझ्या घरी यायचा. एकदा मी परिक्षेसाठी गेले होते. माझा पेपर संपल्यानंतर मी बाहेर आले. तेव्हा तो माझ्यासमोर पैशांची थैली घेऊन उभा होता. हे फारच भीतीदायक होतं. त्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. शेवटी आम्हाला पोलिसांत तक्रार करावी लागली”.
हेही वाचा >> सिनेमाच घडतोय जॉनी डेपच्या आयुष्यात; अँबर हर्डशी घटस्फोटानंतर पडला वकिलाच्या प्रेमात
रिंकूने ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. ‘१००’ डेज या वेब सीरिजमध्ये रिंकूने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासह स्क्रीन शेअर केली होती.