मराठी चित्रपटसृष्टीतील चार-पाच सईपैकी एक म्हणजे सई लोकूर, पण विचारी तरी बिचारी. आता बिचारी अशासाठी की, ‘नो एन्ट्री’वरून निर्मिलेल्या ‘नो एन्ट्री पुढे धाका आहे’ या चित्रपटात तिच्या वाटेला मूळ चित्रपटातील इशा देवलची सोबर भूमिका आली. दुर्दैवाने हा चित्रपट आठवड्याभरात भुर्कन उडाला देखिल.
मग ती ‘जरब’मध्ये अंकुश चौधरीची प्रेयसी म्हणून आली. हा बॉण्डपट अगदीच खेळण्यातील पिस्तूल चालवणारा ठरला. बरं, सईने अंकुशसोबत दिलेल्या छानशा प्रेमाच्या पोझची छायाचित्रे कुठेच प्रसिध्दीला दिली गेली नाहीत. सई फार हिरमुसली हो.
तरी ही मुळची बोळगावची कन्या सहजी हार मानणा-यातली नाही. ती सांगते, माझे काही चांगले मराठी चित्रपट प्रदर्शित होत जाताना परिस्थिती बदलत जाईल. तशी मला कोणत्याही गोष्टीची घाई नाही. प्रसिध्दी आणि गाडी यासाठी मी चित्रपटातून काम करत नाही. चांगले काम करून मग नवीन गाडी आणि मुंबईत नवे घर घेईन. बेळगावात माझ्या तीन गाड्या आहेत. तूर्त एकूणच व्यवसायाचा एक भाग म्हणून पाश्चात्य प्ध्दतीचे फोटोसेशन करून घेतले आहे. सई आपल्या पध्दतीने कारकिर्दीची आखणी करते आहे हे यात जास्त महत्वाचे आहे ना?
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2013 रोजी प्रकाशित
ही ‘सई’ बिचारी ‘सही’
मराठी चित्रपटसृष्टीतील चार-पाच सईपैकी एक म्हणजे सई लोकूर, पण विचारी तरी बिचारी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-10-2013 at 11:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai lokur