मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ती नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला सलमान खान, विकी कौशल, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली. यात सई ताम्हणकर हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. यामुळे सर्व मराठी कलाकारांची तसेच प्रेक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला “कतरिना खूप…”

दरम्यान ‘मिमी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारात एका सरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी तिला विचारण्यात येते. यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते, यानंतर पुढे काय काय होते, यावर ही कथा अवलंबून आहे.

IIFA Awards 2022 : बॉलिवूडसह मराठी अभिनेत्रीनेही ‘आयफा’मध्ये मारली बाजी, पाहा कोणकोण ठरले पुरस्काराचे मानकरी?

यात सई ताम्हणकर हिने क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते.