कलाविश्व म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सेलिब्रिटी आणि त्यांची लक्झरी लाइफस्टाइल. अनेक सेलिब्रिटी खासकरुन त्यांच्या राहणीमानामुळे आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखले जातात. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. सई ताम्हणकर, पूजा सावंत, अभिज्ञा भावे अशा अनेक अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखल्या जातात. मात्र या सगळ्या अभिनेत्रींमध्ये एक अभिनेत्री मात्र निराळी आहे. विशेष म्हणजे तिचा साधेपणाच प्रेक्षकांना विशेष आवडतो. ही अभिनेत्री म्हणजे संपदा जोगळेकर- कुळकर्णी.
नाटक, सूत्रसंचालन आणि निवेदन अशा माध्यमांमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करुन विशेष लोकप्रिय ठरलेल्या संपदा जोगळेकर या अत्यंत साधं राहणं पसंत करतात. त्यांना झगमगत्या दुनियेचं अजिबात आकर्षण नसून साधं पिठलं भाकरी दिली तरी मी आनंदी आहे, असं त्यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये बोलताना सांगितलं.