महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शिवानीने शीतलची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानीने साकारलेले शितली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत असलेली शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. नुकतंच शिवानीने आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
शिवानी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय आहे. नुकतंच शिवानीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजेश टोपे आणि रावसाहेब दानवे दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
‘लागिरं झालं जी’ फेम शितलीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…
“जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल… राजेश सरकटे निर्मित ‘गजर पंढरीचा’ रौप्य महोत्सवी भक्तीमय कार्यक्रमाचा आषाढी एकादशी निमित्त आस्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झाले. आषाढी एकादशीचा तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील याची खात्री आहे. माननीय श्री शरद पवार साहेब, माननीय श्री रावसाहेब दानवे साहेब आणि माननीय श्री राजेश टोपे साहेब अश्या सुश्रुत व्यक्तींची भेट होणे व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणे हा माझ्यासाठी अतिव आनंदाचा अनुभव”, असे शिवानीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
शिवानी ही ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शीतलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेतील शीतलीचा अंदाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेतील अज्या आणि शीतलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. देशासाठी जीवाची बाजी लावणारा फौजी आणि त्याच्या स्वप्नाला आपलं स्वप्न समजणारी शीतली अशी ही कथा प्रेक्षकांना फारच आवडली होती.
शिवानीने शेअर केले अलिबाग ट्रीपमधील काही खास फोटो
त्यानंतर तिने ‘कुसुम’ या मराठी मालिकेत काम केले होते. ही मालिका सोनी मराठीवर प्रक्षेपित होत होती. यात शिवानीची भूमिका प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा अभिनयाचे चाहते फारच कौतुक करताना दिसत आहे.