‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली अनेक वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. श्रेया सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच श्रेयाने अल्का कुबल यांच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची आणि तिच्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
श्रेया बुगडेने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासोबत भाऊ कदम पाहायला मिळत आहे. त्यासोबतच अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानीही त्या दोघांमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत श्रेयाने एक पोस्टही शेअर केली आहे. त्याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
यात ती म्हणाली, “अलका कुबल ताई, बघा आज आम्ही कोणासोबत हवाई सफर केलीय. इशानी आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. खूप प्रेम.” श्रेया बुगडेची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहे.
दरम्यान अलका यांची थोरली मुलगी इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. ईशानीने २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवलं होतं. पण तिला भारतात यायचं होतं म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आणि अखेर भारतातही लायसन्स मिळवलं. इशानी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत विवाहबंधनात आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच स्थायिक आहे.