बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. आता या वादात एका मराठी अभिनेत्रीने उडी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने नुकतंच ‘सकाळ’ला दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका पदुकोण आणि तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल भाष्य केले. यावेळी तिने दीपिकाला एक सल्लाही दिला. तसेच तिला वाटणाऱ्या भीतीबद्दलही तिने बोलून दाखवले. सध्या तिचे यातील वक्तव्य चर्चेत आहे.
आणखी वाचा : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला

स्मिता गोंदकर काय म्हणाली?  

“सध्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे, त्यामुळे मला खरंच भीती वाटू लागली आहे. हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर सर्वप्रथम मी माझं वॉर्डरोब चेक केलं. त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही आहे की नाही, याची खात्री केली. मला तर आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही दडपण येते. चुकून कोणाच्या नजरेस पडली तर ही लोकं आपलं काय करतील, याचा विचार करुनही भीती वाटते.  

सध्या ज्या भगव्या रंगावरनं वाद सुरु आहे, हा हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हणून बोललं जात आहे, तर मग मी दीपिकाला याबद्दल एक सल्ला देईन की तिनं सरळ हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनी परिधान करावी आणि त्यानंतर स्वतःचा फोटो पोस्ट करावा म्हणजे प्रश्नच मिटेल. खरंतर आता जग पुढे चाललंय. ग्लोबलायझेशनमुळे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढतो आहे, पण त्याहूनही अधिक आता आपण हवामानात बदल होत आहे.

मग हा तर चित्रपट आहे. जो जागतिक स्तरावर पाहिला जातो. चित्रपटातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात आणि जर ते त्यात सुंदर दिसत असतील तर त्यांनी ते का घालू नयेत? जर ते चांगले दिसले नसते, तर प्रश्न वेगळा होता, पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही”, असे स्मिता गोंदकर म्हणाली.

आणखी वाचा : “आमचे पैसे…” चित्रपट बॉयकॉट करण्यावरुन पुष्कर श्रोत्रीने राम कदमांना दिले खुले चॅलेंज

दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress smita gondkar bold statement on deepika padukone beshram orange bikini pathaan controversy nrp