मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी किंवा सहज गंमत म्हणून मुंबई लोकलने प्रवास करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेने मुंबई लोकलने प्रवास केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तर त्यापूर्वी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने देखील मुंबईत रिक्षाने प्रवास केला होता. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने मुंबई लोकलने प्रवास केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही चर्चेत असते. नुकतंच सोनाली कुलकर्णीने मुंबई लोकलने प्रवास करण्याचा आनंद घेतला. सोनालीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सोनालीसोबत तिची आई देखील यावेळी लोकल प्रवासाचा आनंद घेताना पाहायला मिळाली.

“फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचे…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोनाली कुलकर्णीने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत ती तिच्या आईसोबत लोकलमध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. याला कॅप्शन देताना सोनालीने म्हटलं की “सावी कुलकर्णीसोबत अनेक वर्षानंतर मुंबई लोकलचा प्रवास.” दरम्यान तिची ही पोस्ट चांगली व्हायरल होताना दिसत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती चक्क महिलांच्या डब्ब्यातून लोकल प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिने एक साधा कुर्ता परिधान केला होता. तसेच प्रवासादरम्यान मास्कही परिधान केला होता. त्यामुळे चाहत्यांना तिला ओळखणे फार कठीण होते. पण तिने शेअर केलेल्या पोस्टवर तिचे अनेक चाहते थक्क झाले.

श्रेयस तळपदे ते स्वप्नील जोशी, मराठी टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण?

सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सोनालीची भूमिका असलेले झिम्मा आणि पांडू हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni enjoy a local train ride in mumbai with her mother nrp