मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या दुसऱ्या लग्नापासून ते सिनेसृष्टीतील चित्रपटापर्यंत ती कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून सोनालीसह तिचा पती कुणाल बेनोडेकर याचीही चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच सोनालीने कुणालसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे.
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

सोनालीने शेअर केलेला हा फोटो परदेशातील आहे. या फोटोत तिच्यासोबत कुणालही दिसत आहे. त्या दोघांचा हा पहिला फोटो असून तो पाच वर्षांपूर्वी क्लिक केलेला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “ओळखा पाहू हा आमचा पहिला एकत्र सेल्फी फोटो कोणी क्लिक केला असेल? सोनाली कुलकर्णी की कुणाल बेनोडेकर? आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबतचा पहिला सेल्फी कधी क्लिक केलाय आठवतो का?.” या फोटोला तिने अनेक हॅशटॅगही दिले आहेत. #thisday #5yearsago #jabwemet #5yearsofbeingtogether #tomanymore #kenosona, असे हॅशटॅग तिने या फोटोंना दिले आहेत.

आणखी वाचा : “काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी कुणालने हा फोटो क्लिक केला असावा, असा अंदाज बांधला आहे. तर काही जण सोनालीने हा फोटो क्लिक केला आहे, असे सांगताना दिसत आहेत. याचाही उलगडा अखेर झाला आहे. सोनाली कुलकर्णीच्या एका चाहत्याने हा फोटो तूच क्लिक केला अशी कमेंट केली आहे. त्यावर तिने थम्ब इमोजी शेअर करत उत्तर बरोबर असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली.

Story img Loader