मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोनाली कुलकर्णीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनाली कुलकर्णीने नुकतंच ट्विटरवर तिच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे.
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

सोनाली कुलकर्णीचे ट्वीट

“नवीन वर्ष
नवी यात्रा
नवा प्रदेश

माझे हे वर्ष खरोखरच आशादायक दिसत आहे
जसे मला अलौकिक बुद्धिमत्तेच्या लिजो जोस पेल्लीसरी यांच्या मल्याळम चित्रपट मलाइकोकटाई वालीबन मध्ये काम करण्याची संधी मिळते आहे. दिग्गज मोहनलाल सरांसोबत”, असे ट्वीट तिने केले आहे.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

दरम्यान सोनाली कुलकर्णीच्या नव्या चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काही लोकांनी मॉलिवूडमध्ये तुझं स्वागत आहे, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी सर महाराष्ट्रात मराठीत प्रदर्शित करा. म्हणजे आम्हाला पाहता येईल, असे म्हटले आहे. सोनाली कुलकर्णीचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.