‘अप्सरा आली’ या गाण्यातल्या अदाकारीतून प्रेक्षकांची मन जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. करोना काळात लॉकडाऊन असताना केवळ आपल्या घरच्यांच्या उपस्थितीत सोनालीने तिचा लग्नसमारंभ आटोपला होता. त्यामुळे तिचे चाहते देखील नाराज झाले होते. मात्र आता तिने पुन्हा एकदा लग्न केले आहे. तिच्या लग्नातील प्रत्येक क्षण आपल्याला बघता येणार आहे.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. यावेळी चक्क त्यांनी लंडनमध्ये लग्नाचा घाट घातला होता. मोजक्याच लोकांच्या आणि मित्र परिवाराच्या साक्षीने ते पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर दिसले नाहीत. दुबईमध्ये झालेल्या लग्नाचे फोटो प्रेक्षकांनी पहिले, मात्र लंडनमध्ये पार पडलेल्या लग्नाचे क्षण आता तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहेत.

Video : “मला चार वेगवेगळ्या…” सोनाली सांगतेय पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! व्हिडीओ पाहिलात का?

गेल्या अनेक दिवसांपासून हटके वेबसिरीज आणणाऱ्या प्लँनेट मराठीवर हा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “लग्न या गोष्टीबद्दल मला पहिल्यापासून आकर्षण होतं. अनेक अडचणी, पँडेमिक आले तरी मला चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करायचं होतं. या सगळ्या गोष्टींवर मात करुन अखेर माझं हे स्वप्न पूर्ण होतंय.”

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या पाठोपाठ मराठी कलाकारही यात मागे नसल्याचे दिसत आहे. विराजस कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, आलोक राजवाडे यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडीओ चक्क ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात

नुकतंच या सोहळ्याची फक्त झलक पाहायला मिळत आहे. येत्या ११ ऑगस्टला हा सोहळा प्लॅनेट मराठीवर काही भागांमध्ये आपल्याला पहिला मिळणार आहे. लग्न सोहळ्याचा ट्रेलर बघितल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान सोनाली ही सध्या आपल्याला डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच तिचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.