बॉलिवूडमधील काही चित्रपट हे अजरामर आहेत. यात शोले, दिलवाले दुलहनिया ले जायेंगे, हम आपके हैं कौन यांसारख्या अनेक चित्रपटांच्या नावाच्या यादीचा समावेश आहे. याच यादीतील आणखी एक चित्रपट म्हणजे दिल चाहता है. अक्षय खन्ना, आमिर खान आणि सैफ अली खान या तिघांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आजही घराघरात लोकप्रिय आहे. या चित्रपटाला नुकतंच २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने एका मराठी अभिनेत्रीने खास पोस्ट केली आहे.
दिल चाहता है या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्रीही झळकली होती. या अभिनेत्रीचे नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. यात तिने सैफ अली खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. दिल चाहता है या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २१ वर्ष झाली. त्यानिमित्ताने सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
“४८ तासांपासून मी झोपलेलो नाही कारण…” आमिर खानने केला खुलासा
यात तिने या चित्रपटातील काही मोजके फोटो शेअर केले आहेत. या फोटोना तिने खास कॅप्शनही दिले आहे. “दिल चाहता है… कभी ना बिते चमकीले ये दिन” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
“इस्लाम धर्मामध्ये…” ‘हर हर शंभो’ गायिकेने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आजही तरुणाईमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने मैत्रीची एक वेगळीच परिभाषा प्रेक्षकांसमोर सादर केली होती. मैत्री, प्रेम, नाती या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाची मांडणीही तितकीच रंजक होती. त्यामुळेच फरहानच्या दिग्दर्शनाचंही अनेकांनीच कौतुक केलं.
तीन जिवलग मित्र, त्यांची ताटातूट, तिघांच्या प्रेमकहाण्या, मित्रांच्यातील थट्टा मस्करी, उत्तम कथानक आणि संवाद तितकंच श्रवणीय संगीत अशी उत्तम मांडणी या चित्रपटात पाहायला मिळाली. अभिनेता, गायक फरहान अख्तर या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. हा चित्रपट १० ऑगस्ट २००१ साली प्रदर्शित झाला होता. तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.