आज २७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा दिवस म्हणूनही याकडे पाहिले जाते. याच दिनाचे औचित्य साधत मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणत्याही भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच सोनालीने तिची लेक कावेरीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आमच्या घरी १२ महिने मराठी भाषा साजरी होते’, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिची मुलगी कावेरी ही गुढीपाडवा सणाबद्दल माहिती सांगताना दिसत आहे. कावेरीने एका फळ्यावर गुढीचे चित्र रेघाटलं आहे. त्यानंतर तिची आई तिला याबद्दलची माहिती विचारते. यावर कावेरी ही फार गोड आवाजात मराठीत याचे उत्तर देते. यावेळी ती चुकून कडुलिंबऐवजी कडिपत्ता असेही म्हणते. यावर सोनाली जोरजोरात हसू लागते.

इतकच नव्हे तर सोनालीने तिच्या फळ्यावर केलेल्या मराठीच्या अभ्याचे काही जुने फोटोही तिने शेअर केले आहेत. यातील दोन फोटोंमध्ये कावेरीचा अभ्यास पाहायला मिळत आहे. तर शेवटच्या फोटोत तिच्या आजी-आजोबांनी तिच्यासाठी लिहिलेला एक गोड संदेश पाहायला मिळत आहे. ‘कावेरी ही खूप गोड मुलगी आहे. आमच्या नातीचा आम्हाला अभिमान आहे’, यावर लिहिले आहे.

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

दरम्यान सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओखाली अनेक कलाकार मंडळी कमेंट करताना दिसत आहे. त्यासोबत अनेक नेटकऱ्यांनी फार छान अशा विविध कमेंट या पोस्टवर केल्या आहेत.