मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाली कुलकर्णी ही लवकरच “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘झी मराठी’वरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली. या निमित्ताने सोनालीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे
कोणत्याही भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच सोनालीने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
“आमच्या या प्रवासात तो नसता तर…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट
“हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या. किती दिवसांनी ( वर्षांनी ) मला ह्या सेटवर जाता आलं आणि श्रेया, निलेश, भाऊ, सागर, कुशल, तुषार आणि गॅंगमुळे हा..हा..कार अनुभवता आला. स्वप्निल जोशी हा बोनस आहे.
आमच्या दिल दिमाग बत्तीला थुकरटवाडीत बोलवल्याबद्दल हार्दिक आभार झी मराठी…आज रात्री बघा हं…”,, असे सोनालीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
‘दिल दिमाग बत्ती’ या चित्रपटाची कथा फार वेगळ्या धाटणीची आहे. या चित्रपटात अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी मोहन देसाई हे पात्र साकारलं आहे. तर वंदना गुप्ते यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या दोघांचेही लूक भन्नाट असून ते पाहून प्रकर्षाने ८० च्या दशकाची आठवण करुन देतात. या चित्रपटात दिल, दिमाग असे दोघे भाऊ आणि बत्ती नावाची त्यांची बहीण यांची ही कथा आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे किशोर, आनंद कुलकर्णी, वैभव मांगले, सोनाली कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज, सागर संत अशा नव्या-जुन्या कलाकारांनी एकत्र येऊन काम केलं आहे.