मराठी माणसाच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक म्हणजे, जगातील कोणत्याही क्षेत्रात मराठी व्यक्ती नावाजली, उंचीवर पोहचली की त्याला आपलेच कोणीतरी मोठे झाल्याचे वाटून भरपूर आनंद होतो.

आणि तीच व्यक्ती मराठीच्या संदर्भात कुठे जोडली गेली की त्याचा हाच आनंद व्दिगुणीत होतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकार हा मराठी मनाला कायमच सुखावणारा. विशेषतः महाराष्ट्रीय अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत आपली गुणवत्ता, सौंदर्य, नृत्य, फिटनेस, व्यावसायिक बाणा या गुणांवर आपले स्थान निर्माण करते आणि तेथील फिल्मी वातावरणातही आपली मराठी भाषा बोलायला कचरत नाही, अधूनमधून मुलाखतीमधून आजही मी आईच्या हातचा वरणभात खाते असे सांगते याचे मराठी मनाला केवढे कुतुहल आणि कौतुक काही विचारूच नका. काही झाले तरी ती मराठी संस्कार, संस्कृती, परंपरा, मूल्ये विसरली नाही असे पटकन सहजच गौरवोद्गार निघतातच…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अशातच ती मराठी चित्रपटात आली की….
नुसत्या घोषणेपासूनच ‘तिच्या ‘भोवती चर्चा सुरु होते.
त्यातील काही ठळक मुद्दे (की भाबड्या समजूती?)
बरं झालं बाई ती मराठी चित्रपटात आली ते …इतकी मोठी होऊनही मराठीला विसरली नाही हो … हिंदीत राहून तिचे मराठी बिघडले नसेल ना? मराठीत थोडी उशिराच आली, पण आली हे महत्त्वाचे मराठीत तिने किती मानधन घेतले असेल हो? तिने नक्कीच मराठीसाठी ते कमी केले असणार, हिंदीत किती पाहिजे तेवढे कमव. मराठीत तुला चांगल्या कामाचे खूपच समाधान मिळेल बघ…. वगैरे वगैरे. पूर्वी मराठी नियतकालिकात वाचकांच्या पत्रात हा सूर असे, आता सोशल मीडियात असतो. माध्यमे बदलली तरी सूर तोच प्रेमाचा व आपुलकीचा.

हिंदीतून मराठीत येणार्‍या मराठी अभिनेत्रींची परंपरा नूतन- तनुजा या बहिणींपासून खूप मोठी आहे. कधी हिंदीतील एकादी मराठी अभिनेत्री म्हणते, चांगली पटकथा असेल तर मी मराठीत नक्कीच काम करेन. कधी मात्र ‘हृदयनाथ’, ‘आजोबा’ हे चित्रपट पाहिल्यावर प्रश्न पडला उर्मिला मातोंडकर मराठीत का बरे आली? निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यानी ‘माहेरची साडी ‘साठी भाग्यश्रीच हवी म्हणून बराच काळ प्रयत्न केला पण अखेर अलका आठल्येला ती सोशिक नायिका फिट्ट ठरली. किरण वैराळे अशीच हिंदीतून मराठीत आली, आज झाले मुक्त मी या चित्रपटात भूमिका करताच लग्न करून अमेरिकेत गेली. पद्मिनी कोल्हापूरेने महेश कोठारेचा ‘चिमणी पाखरं ‘, डॉ. मृणालिनी पाटीलचा ‘मंथन’ अशा काही चित्रपटातून भूमिका साकारलीय. पद्मिनीचा मुलगा प्रियांक अतिशय उत्तम मराठी बोलतो. नम्रता शिरोडकरने ‘वास्तव’, मध्ये तर शिल्पाने ‘सौभाग्यवती सरपंच ‘मध्ये भूमिका साकारलीय. नम्रताला तिची आजी मीनाक्षीताई शिरोडकर यांचा छान सहवास लाभल्याने तिचे मराठी खूप शुध्द राहिले. सोनाली बेंद्रेच ‘अगं बाई अरेच्चा ‘मधील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या आयटम साँगची लोकप्रियता अबाधित आहे. अमोल पालेकर यानी ‘अनाहत ‘ची पटकथा सोनालीला खरं तर हिंदीत ऐकवली. काही कारणास्तव हा चित्रपट त्याना मराठीत करण्याचा निर्णय घ्यावा लागला पण सोनालीने पटकथा व भूमिका आवडल्याने आपला होकार कायम ठेवला हे कौतुकास्पद आहे. गंमत म्हणजे, सोनाली खूप त्रास देईल असे अमोल पालेकरना काहीनी आवर्जून सांगितले, पण तसे काहीच झाले नाही. तात्पर्य हिंदीत वावरुन/ वाढूनही आपल्या मराठी अभिनेत्रीमध्ये तद्दन फिल्मीपणा येत नसतो ( अथवा हिंदीत कोणाशी कसे वागायचे याचे त्यांचे गणित वेगळे असावे.

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट 

माधुरी दीक्षित वीस- बावीस वर्षांपूर्वीच मराठीत यायला हवी होती असे अनेक मराठी चित्रपट रसिकांना मनोमन वाटते. विशेषतः १९९९ साली लग्न करून ती अमेरिकेत जाण्यापूर्वी तिने मराठीत भूमिका करावी अशी तिच्या महाराष्ट्रीय चाहत्यांची खूपच इच्छा होती. पण तेव्हा तिचे समाधान होईल अशी तिला पटकथा व भूमिकाच मिळाली नसेल तर? हिंदीतून मराठीत येताना अगदीच कोणत्याही चित्रपटातून भूमिका साकारणे योग्य नाहीच. हिंदीतील आपला क्लास, पोझिशन, आपली अभिनय शैली, आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा हे सगळेच पाह्यला हवे ना? मराठीत आपण कोणासोबत काम करणार आहोत, मराठीत सध्या कोणत्या स्वरुपाचे चित्रपट निर्माण होत आहेत ( त्यातले यशस्वी कोणते होतात हा प्रश्नही आजच्या व्यावहारिक जगात खूपच महत्त्वाचा) याचे होमवर्क देखील हवेच…

हिंदीतून मराठीत येणाऱ्या या अभिनेत्रीना एका हुकमी प्रश्नाला उत्तर द्यावे लागतेच.
तो म्हणजे, तुझे मराठी चित्रपट पाहणे कितपत आहे ?
यावरच्या उत्तरात, पिंजरा, श्वास या चित्रपटाची नावे हुकमी असतात हा योगायोग समजावा.