गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे. तेजस्विनी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तेजस्विनी पंडितने गणपतीच्या निमित्ताने एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. त्याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. याला तिने फार हटके कॅप्शनही दिले आहे.
तेजस्विनी पंडित ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतंच तेजस्विनीने एक नवीन महिंद्राची xuv 700 ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यासोबत तिने गाडीसाठी एक पोस्टही शेअर केली आहे.
तेजस्विनी पंडितची खास पोस्ट
“गणपती बाप्पा मोरया ||
माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय…
“माझी स्वतःची नवीन कार….
माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती…
पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. आजपर्यंत खूप प्रवास केला… पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची “मज्जा लुटायची… ” आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा “बाबा”…तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं…महिंद्रा आणि शरद जी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही दिलेल्या या अत्यंत तत्पर सेवेबद्दल आणि मला एका कुटुंबाप्रमाणे वागवल्याबद्दल धन्यवाद ! मला विश्वास आहे की माझ्या नवीन प्रवासात ही गाडी माझ्यासाठी भक्कम आधार ठरेल”, असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे.
दरम्यान तेजस्विनी ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडाची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत तिने अनेक गाजलेले मराठी चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजमध्ये झळकली आहे. काही दिवसांपूर्वी ती रानबाजार या सीरिजमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता लवकरच ती निर्माती म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना दिसणार आहे.