अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे सध्याच्या अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ आणि उर्मिलामध्ये काही तर मतभेद सुरु आहेत, अशीही चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

आदिनाथ कोठारे हा गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काहा दिवसांपासून तो त्याच्या या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. पण त्याच्या या चित्रपटच्या प्रमोशनसाठी किंवा चित्रपटाच्या प्रिमिअरला उर्मिला ही कुठेच पाहायला मिळाली नाही. तिने आदिनाथच्या या चित्रपटासाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतर बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात

तसेच ४ मे रोजी उर्मिलाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त आदिनाथ नेहमी काही ना काही पोस्ट करत असतो. मात्र यंदाच्या तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने काहीही पोस्ट शेअर केली नव्हती. तसेच्या वाढदिवसाचे फोटो किंवा व्हिडीओही समोर आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या काहीतरी वाद सुरु असल्याचे चर्चा रंगली.

त्यासोबत लग्नानंतर अनेक वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. घरचं प्रॉडक्शन हाऊन असूनही ती अभिनयापासून तशी लांब राहिली. अनेकदा ती एखाद्या चित्रपटात दिसायची, मात्र तिने नृत्य कलेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं होतं. कोठारे व्हिजन या त्यांच्या होम प्रॉडक्शनमध्ये महत्त्वाची जबाबदारी तिच्याकडे असायची. मात्र ती वैयक्तितरित्या फारशी रमलेली दिसलीच नाही.

“डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू”, आनंद दिघेंच्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

त्यानंतर आता अनेक वर्षांनी तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण घरचं प्रॉडक्शन हाऊस असताना इतक्या वर्षांनी उर्मिलाने दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेतून पुर्नपदार्पण का केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच सध्या या चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान उर्मिला किंवा आदिनाथकडून यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. तसेच अनेकदा तिने या प्रश्नावर बोलण्यास टाळाटाळ केल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्या दोघांचे नेमकं काय सुरु आहे? त्या दोघांमध्ये नक्की वाद सुरु आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे. तसेच अनेकांना हे ऐकल्यावर थोडा धक्काही बसला आहे.

Story img Loader