देशात डिजीटल व्यवहारात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही या घटनेत जास्त वाढ होताना दिसत आहे. पण याबद्दल पुरेसे ज्ञान असल्यास तुम्हाला या घटना टाळता येतात. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्री सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली आहे. तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

अभिनेत्री उर्मिला कोठारे ही कायमच सक्रीय असते. गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारेला ओळखले जाते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कशाप्रकारे सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात बिनसलं? चर्चांना उधाण

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dhfl scam of wadhawan family
घोटाळ्यांचे घराणे (डीएचएफएल)
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल

उर्मिला कोठारेने एक इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यात तिने एचडीएफसी बँकेबद्दल आलेल्या फ्रॉड मेसेजबद्दल उल्लेख केला आहे. तिला आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही एचडीएफसी बँकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. त्यामुळे ते ब्लॉक करण्यात आले आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’, असे यात म्हटले आहे.

उर्मिला कोठारेने तिला आलेला हा मेसेज वाचला. या मेसेजमध्ये असलेल्या लिंकवरुन तिला संशय आला. तसेच तो फ्रॉड असल्याचे तिला समजले. या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने याबद्दल भाष्य केले आहे.

आणखी वाचा : उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”

“मला नुकताच एक मेसेज आला. अनेकजण अशाप्रकारे आलेले मेसेज वाचून पॅनिक होतात आणि यासारख्या लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या खासगी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांकडे जाते. यामुळे तुमचे बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकते. मी ती लिंक पाहिली यात HDFC बँकचे नाव पूर्ण लिहिण्यात आले नव्हते. त्यामुळे मला शंका आली. सॉरी आज तुमचे नशिब कमजोर आहे”, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान उर्मिलाने हा मेसेज वाचल्यामुळे ती सायबर क्राईमची शिकार होता होता वाचली आहे. मात्र तिने तिच्या चाहत्यांना तसेच सर्वसामान्यांना याबद्दल सतर्क केले आहे. अशाप्रकारे मोबाईलवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करु नका, असेही आवाहन केले आहे.