मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. नुकतंच त्या झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमादरम्यान उषा नाडकर्णी यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मला चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अशी खंत व्यक्त केली.
आणखी वाचा : “मोठ्या नट्या…” उषा नाडकर्णींनी नवोदित येणाऱ्या अभिनेत्रींचे टोचले कान

तुझ्या अभिनयाला वाव देणारी भूमिका आजवर कधी मिळाली नाही असं तुला वाटतं का? असा प्रश्न सुबोधने उषा नाडकर्णींना विचारला. त्यावर उषा नाडकर्णींनी हो असे उत्तर दिले. त्यावर सुबोधने हे उत्तर मला अपेक्षित होतं, असे सांगितले. त्यावर पुढे सुबोधने असे का वाटतं असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “कितीतरी चांगले चांगले रोल होते. आई रिटायर होते यामधली भूमिका, संतू रंगीली या गुजराती नाटकात मनसूख म्हणून होते. त्यांचा मुलगा राजीव जोशी याने आमचं पवित्र रिश्ता लिहिलं.

https://fb.watch/fwyzB7fcg8/

आणखी वाचा : “…असा महानायक शतकातून एकदाच होतो” केबीसीमधील स्पर्धकाचे अमिताभ बच्चन यांना पत्र

“त्यावेळी त्यांनी मला संतू रंगीली या नाटक पाहायला ये असे सांगितले आणि ते मला घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी आपण मराठीत हे नाटक करणार आहोत, तेव्हा ते तू करशील असे सांगितले होते. असे एक नाही खूप रोल आहेत. त्या भूमिकेतील लोकांनी जे केले त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने केले असते”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. अमृता फडणवीस, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, किशोरी पेडणेकर या राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यासह अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, हृता दुर्गुळे, सई ताम्हणकर यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress usha nadkarni zee marathi bus bai bus programme talk about role nrp