अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सामील आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग बनला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झोंबिवली’ या तिच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

वैदेही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिचे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे रील्स आणि फोटो ती शेअर करत असते. शिवाय सध्या ती ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालनही करत आहे. या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या लूकमधले फोटो वैदेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. नुकतंच तिने एका अभिनेत्याबद्दल एक पोस्ट केली आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

आणखी वाचा : जपानमध्ये प्रदर्शित झाल्यावर ‘RRR’ने मोडला २४ वर्षांपूर्वीचा रजनीकांत यांचा ‘हा’ रेकॉर्ड

मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर वैदेहीने फोटो शेअर केला आहे. तो अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेश कामत आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. याबद्दल एक खास फोटो शेअर करत वैदेहीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इनस्टा स्टोरीच्या माध्यमातून फोटो शेअर करत वैदेहीने लिहिलं की, “महाराष्ट्राचा हँडसम हीरो, हसरा तारा उमेश कामत याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.” वैदेहीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

vaidehi parshurami post
vaidehi parshurami post

‘फू बाई फू’ जरी काही दिवसांत बंद होणार असलं तरी वैदेही आता ‘एक दोन तीन चार’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.हा चित्रपट एक हलकी-फुलक लव्हस्टोरी असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण आणि वैदेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.लोकप्रिय दिग्दर्शक वरुण नार्वेकर ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याने यापूर्वी मुरांबा सारखा चित्रपट तसेच ‘…आणि काय हवं!’ या गाजलेल्या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader