मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वंदना गुप्तेंना ओळखले जाते. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. नुकतंच त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंदना गुप्ते यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत स्वत: वंदना गुप्ते, प्रशांत दामले, कविता मेढेकर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत वंदना गुप्ते, सुधीर जोशी आणि विवेक लागू हे कलाकार पाहायला मिळत आहेत. हा फोटो ‘पाहू कशाला कुणाकडे? ‘ नाटकातील आहे.
आणखी वाचा : Video : किली पॉलच्या बहिणीला पडली मराठी गाण्याची भूरळ, ‘बहरला हा मधुमास’वर रील शेअर करत म्हणाला…

या फोटोला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. “या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंचे सौंदर्य पाहा, या फोटोतील हावभाव खूपच विलक्षण आहेत”, असे वंदना गुप्तेंनी कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मी स्वरा आणि ते दोघे’ नाटक पाहण्यासाठी पोहोचले जॉनी लिवर, निवेदिता सराफ म्हणाल्या “जॉनी भाऊ…”

दरम्यान वंदना गुप्ते यांनी अनेक नाटक, मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘फोटोकॉपी’, ’66 सदाशिव’, ‘वेल डन बेबी’, ‘डबल सिट’, ‘मातीच्या चुली’, ‘बे दुणे साडे चार’, ‘टाईनप्लीज’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘बकेट लिस्ट’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘व्हॉट्सअप लग्न’, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vandana gupte share black and white photos see caption nrp
Show comments