मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या नैसर्गिक अभिनयाने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी या मालिकेत ‘वच्छी आत्या’ ही भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दमदार कमबॅक केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. नुकतंच त्यांनी यावर उत्तर दिले आहे.

वर्षा दांदळे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच विविध फोटो टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांच्या कारचा अपघात झाला होता. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून वर्षा या अंथरुणात होत्या. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. पण त्या आता ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. या आधी त्यांनी ‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका, ‘रानजाई’ या चित्रपटात काम केले आहे.
आणखी वाचा- अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
What is 'Johatsu'
Johatsu: एका रात्रीत माणसं गडप; जपानमधील थरकाप उडवणारा ‘जोहत्सू’ हा प्रकार नेमका आहे तरी काय?
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
This young girl burns cloth on gas to Shoot reels Video netizens warned her that you would have died
“अगं रिलच्या नादात मेली असती!”, नेटकरी स्पष्टच बोलले; गॅसवर ओढणी जाळून…पाहा Viral Video
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात

अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्याबद्दल एका ऑनलाईन पोर्टलने अफवा पसरवणारी बातमी केली होती. वर्षा दांदळे या अंथरुणाला खिळून आहेत, असे त्यात म्हटले होते. तसेच त्यांची अवस्था पाहून धक्का बसेल असेही या वृत्तात म्हटलं होते. त्यावर वर्षा दांदळे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. त्यांनी या बातमीखाली कमेंट केली आहे. “मी छान ठणठणीत आहे. कोण आहेत ही माणसं. यांना कामधंदे नाहीत का काही” अशी कमेंट वर्षा दांदळे यांनी केली आहे.

त्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. वर्षा यांच्या चाहत्यांनीही विविध कमेंट्स करत पाठिंबा दिला आहे. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा निषेध अशा प्रतिक्रियाही या वृत्तावर पाहायला मिळत आहेत. तर काहीजण त्यांच्या ‘नवा गडी नवं राज्य’मधील भूमिकेचं कौतुक केलं आहे.

Varsha Dandale Angry

आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान वर्षा तांदळे यांनी पाहिले नं मी तुला या मालिकेत काम केले आहे. त्यांनी या मालिकेत उषा म्हणजेच अनिकेतच्या आईचे पात्र साकारले आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याबरोबर त्यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत.

Story img Loader