‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिका’ (इफ्सा) च्या शनिवारी पारपडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी अभिनेत्री वीणा जामकरला ‘टपाल’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
‘मैत्रेय मास मिडिया’ची पहिली निर्मिती असलेल्या ‘टपाल’ चित्रपटोचे दिग्दर्शन ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. ‘टिंग्या’ फेम मंगेश हडवळे यांच्या लेखनीमधून ‘टपाल’ साकारला आहे. वीणा जामकरने या चित्रपटामध्ये पोस्ट मास्तराची पत्नी ‘तुळसा’ची भूमिका साकारली आहे. या पुरस्कार समारंभामध्ये एकूण १५ भारतीय भाषांमधील चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘अस्तु’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘टपाल’ चित्रपटाने सामाजिक आशय हाताळल्यानेच चित्रपटला हा गौरव मिळाला असल्याचा दावा चित्रपट निर्मात्यांनी केला आहे.            

Story img Loader