महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. सध्या त्या शुभविवाह या मालिकेत झळकत आहेत. आता त्यांनी त्यांच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाखा सुभेदार यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येईल, असे सांगितले आहे.
आणखी वाचा : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अक्षया देवधर पोस्ट करत म्हणाली, “माझा नवरा…”

विशाखा सुभेदार यांची पोस्ट

Show must go on… Kurrrr- कुर्रर्रर्रर्र
कुर्रर्रर्रर्र हे माझ, प्रग्यास चं पहिलं नाटक.. 4 डिसेंबर ला शुभारंभ होऊन आता दोन वर्ष पूर्ण होतील..!

Covid, सारख्या काळत धडपड करून नाटक उभं केल..साथीला Prasad Khandekar आणि Namrata Yogesh Sambherao Paddy Kamble ही मित्र मंडळी होतीच.. पण आता त्यात काही बदल घडतायत… काहीही झालं तरी जोवर नाटक जगतंय तोवर जगवायचं हे production चं काम.. आणि तेच इमाने इतबारे मी करत राहणार.. पुन्हा एकदा मोट बांधतेय… बदल काय?? तो लवकरच कळवेन.. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या, असे विशाखा सुभेदार यांनी म्हटले.

आणखी वाचा : Video: पृथ्वीक प्रतापला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; व्हिडीओ पाहून प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली, “शाहरुख खान सारखं…”

दरम्यान विशाखा सुभेदार यांच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकात नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आणि स्वत: विशाखा सुभेदार हे कलाकार पाहायला मिळतात. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar kurrr drama play will start soon share post on instagram nrp