अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. नुकतंच विशाखा सुभेदारने तिने तिच्या कॉस्च्युम डिझायनरबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाखा सुभेदार ही नेहमीच इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. ती कायमच विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कार्यक्रमातील साडी परिधान करणारी आणि केसरचना करणाऱ्या महिलेबद्दल कमेंट केली आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट

Oh my god.. I look gorgeous.!
साडी माझा वीक पॉईंट आहे..मला प्रचंड आवडते साडी. आणि ती कशी नेसावी हे माझ माझ टेकनिक आहे, पद्धत आहे.
पायघोळ, आणि घाट वळण(जशी असतील तशी )पण ती सुद्धा नेमकीच दिसतील अश्या पद्धतीने साडी नेसायला मला जाम आवडत.
साडी गुंडाळण आणि साडी नेसणं ह्यातला हाच फरक असावा.
साडी किंवा काहीही कॅरी करणं ही सुद्धा कला आहे.कुठल्या फॅब्रिक ची साडी,कशी नेसावी हे सुद्धा समजुन घ्यावं लागत.
माझ्या costume बरोबरीने महत्व असत माझ्या केशभूषे ला.
त्यामुळे लूक संपूर्ण बदलतो.
आणि मला पुर्ण बदलण्याचं सगळं क्रेडिट जात..
माय पॉवर वूमन.. सुलभा सोनावणे… अ वंडर वुमन

माझ्या सुलभाच्या हातात जादू आणि तिच तिच्या कामावर खुप प्रेम आहे.
मला मुळात अशी माणसं खुप आवडतात ज्यांचं त्यांच्या कामावर खुप प्रेम असत आणि त्यासाठी त्या वेळ,पैसा,कमी जास्त ह्याची पर्वा करीत नाहीत. आणि सुलभा त्या पैकी एक आहे. तिच्या हातात मी माझें डोकं देऊन टाकते आणि निर्धास्त होते.. कारण पुढे जे होणार ते उत्तमच असणार ह्याची खात्री असते. एखाद दिवशी तिच्या हातून सुद्धा गंडतात गोष्टी. पण जोवर मला आवडत नाही तोवर ती आणि माझे केस….! सुरु असत युद्ध..!

तिला माझ्या चेहेऱ्यावरून, डोळयांमध्ये कळत. आवडलं की नाही आवडल,मला ते तिला सांगव लागत नाही…!
आणि मी तयार झाले की सुलभा माझ्या प्रेमात असते.. सगळ्यांनी सांगितलं आज लूक मस्त झालाय, छान दिसतायत विशाखा ताई.. असं कानावर पडलं की मग हि बाई सुखाने घरी जाते.आणि पॅकअप झाल्यावरहि “विशू रील कर “म्हणून मागे लागते.

सुलभा तू कितीही म्हातारी झालीस तरी तुझ्या थरथरत्या हातांमध्ये केसाची पकड घट्ट असेल ह्याची खात्री आहे मला.
आणि काठी टेकत टेकत का होईना तू सेटवर यायचसच, 4 मुली ठेव हाताखाली, पण तू मला हवीच तुझ्याशिवाय मी कुठल्याही वयात आणि कुठल्याही भूमिकेत छान दिसूच शकणार नाही. Love u सुलभे…., असे विशाखा सुभेदारने म्हटले आहे.

दरम्यान विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.